महाराष्ट्र
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती, नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय

नाशिक प्रतिनिधी : राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यावर असलेल्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. २० वर्षांपूर्वी सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, आणि त्यासंदर्भातील खटला अद्याप न्यायप्रविष्ट आहे.
या प्रकरणात न्यायालयाने काही दिवसांपूर्वी त्यांना शिक्षा सुनावली होती. मात्र, कोकाटे यांनी याविरोधात सत्र न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने त्यांच्या याचिकेची दखल घेत शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
या निर्णयामुळे कोकाटे यांना राजकीय आणि वैयक्तिक दोन्ही पातळीवर मोठा दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणाचा पुढील न्यायालयीन लढा कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.