मुंबई मेट्रो 3 एक्वा लाइन पहिल्याच पावसात ठप्प! वरळी भूमिगत स्थानक जलमय…
मुंबई : मुंबईच्या पहिल्याच पावसाचा फटका मुंबई मधील एक्वा लाइन-3 ला बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानका च्या आत पावसाचे पाणी घुसले आहे. दरम्यान, पाणी साचल्यानंर मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुयारी मेट्रोकडे जाणारे गेटही बंद करण्यात आले आहे
मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो मार्गिकेला नुकतीच सुरवात झाली आहे. मात्र, मंबई आणि उ्पनगरातील वाहतूक सुखकर करण्यासाठी सुरू केलेल्या या एक्वा लाइन-3 मध्ये पहिल्याच पावसामुळे प्रवासांची गौरसोय झाली आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळी पर्यतच्या मार्गिकेला पहिल्या पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे.
आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकात पाणीच पाणी
पावसाचे पाणी हे भुयारी मेट्रोच्या स्थानकांमध्ये शिरले. पाण्याचा लोंढा आत शिरल्यामुळे भुयारी मेट्रो स्थानकांच्या छतामधून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. एवढेच नव्हे तर भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात पाणी शिरल्याने येथील सुरक्षा उपकरणे, चेकिंग पॉईट, सरकते जिने आणि लाखोंच्या उपकरणांचे नुकसान झाले आहे. पाणी शिरल्यामुळे या मेट्रो स्थानकातील अनेक गोष्टी निकामी झाल्याचे दिसून आले. सध्या मेट्रो प्रशासनाने एक्वा लाईन बंद केली आहे.
या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी MMRC (मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.) कडे संबंधित अधिकाऱ्यांची व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.
अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार “बांधकामाच्या वेळी मुसळधार पावसाचा विचार करून योग्य जलनिकासी व्यवस्था केली गेली असती, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पावसाचे पाणी थेट स्टेशनमध्ये शिरणे हे जलप्रतिबंधक उपाय अपुरे असल्याचे निदर्शक आहे. उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच सेवा ठप्प होणे ही देखभाल व नियोजनातील गंभीर त्रुटी आहे.”
या प्रकारामुळे मेट्रो प्रकल्पातील गुणवत्ता नियंत्रण, देखभाल नियोजन आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि कंत्राटदारांकडून नुकसानभरपाई घेण्यात यावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.