गोरेगाव मिरर
काश्मीर फाईल्स हा चित्रपट राज्यात कर मुक्त करावा – आ. अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई:सध्या देशभर गाजत असलेला ‘द काश्मीर फाईल्स’ या जम्मू काश्मीर मध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचं चित्रण करणाऱ्या चित्रपटास राज्यात कर मुक्ती (Tax free) मिळावी अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
जम्मू काश्मीर मधील हिंदू समाजावर मुस्लिम दहशतवाद्यानी अनन्वित अत्याचार केले याचं योग्य आणि खरं चित्रीकरण एका चित्रपटाच्या माध्यमातून या देशातील जनतेसमोर येत आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे मुख्यमंत्री हा चित्रपट अनेक लोकांनी पहावा याकरिता नक्कीच प्रोत्साहन देतील असा विश्वास आहे असेही शेवटी आ. भातखळकर म्हणाले.