कोंकण

आत्मनिर्भर सिंधुदुर्ग:धामापूर चा रोहित झाला ऊद्योजक, वाचा यशोगाथा

आज्जी लाच बनवले ब्रँड अॅंबासिडर…

सिंधुदुर्ग: निसर्गसंपन्न धामापूर म्हणजे काही क्षणाकरता देवभूमी केरळच्या संपन्न हिरवाईची आठवण करुन देणारा प्रांत.

याच धामापूरमधले एक दुकान सध्या चर्चेचा विषय बनलय. ‘आजगावकर आजी किचन एंड इको स्टोर’ नावाची ही पाटी कुण्या रोहित किंवा आणि तिच्या आजीची गोष्ट नाहीये तर या जिल्ह्यातील संपन्न असणाऱ्या खाद्यसंस्कृतीची आता ओळख बनली आहे.

रोहित आजगावकर हा धामापूरचा एक छोटासा उद्योजक.. नाविन्याच्या शोधात असलेल्या या नातवाला साथ दिली त्याच्या आजीने आणि सुरु झाला पर्यावरणपूरक खाद्य कारखाना ‘आजगावकर आजी किचन एंड इको स्टोर’. आपल्या राहत्या घरी व्यवसायाची मुहूर्तमेढ करत रोहितने आत्मनिर्भर सिंधुदुर्गचा नारा दिलाय.

रोहित हा मुळात मेकॅनिकल इंजिनियर. शिवाजी विद्यामंदिर काळसे येथे शालेय शिक्षण घेऊन त्याने भारतीय विद्यापीठ, मुळशी इथून इंजिनीरिंग चे शिक्षण पूर्ण केले. पण या पठयाने इंजिनीरिंगची डिग्री घेऊन सुद्धा त्याने कॅम्पस प्लेसमेंट मध्ये भाग घेतला नाही आणि सरळ आपले निसर्गसंपन्न काळसे-धामापूर गाव गाठले. सुरुवातीची काही वर्षे एलआयसीचा व्यवसाय आणि जगण्यात गांधीजीच्या  ग्रामीण विकास तत्वज्ञान या मार्गावर चालताना त्याला हा उद्योगाचा मार्ग मिळाला. आजीच्या हातची चव, या चवीतून बनलेली गृहपयोगी वस्तू आणि दुकानाला दिलेली पारंपरिक मालवणी सजावट यामुळे आजगावकर आजी किचन इको स्टोअर चर्चेत आलय.

 

 

या व्हिडीओ वर क्लिक करा आणि प्रत्यक्ष पहा:-

 

मग भेट देताय ना या ‘आजगावकर आजी किचन एंड इको स्टोर’ला ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!