महाराष्ट्रमुंबई

मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची १००० कोटींची तरतूद मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश

महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्री राणे यांच्या सूचना

मुंबई (प्रतिनिधी ) – नुकतच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.या बैठकीला मत्स्यविकास मंत्री नितेश राणे , पदुमचे सचिव रामास्वामी एन,मत्स्यआयुक्त किशोर तावडे,राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर,व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे व अन्य अधिकारी यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते.

मत्स्य विभागाला कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर मच्छीमारांचे जीवनमान आणखी उंचावे यासाठी मत्स्यविकास मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत. त्याच माध्यमातून आजच्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत मच्छीमारांना आधुनिक बोटींसाठी, अवजारांसाठी,कोल्ड स्टोअरेजसाठी, जाळ्यांसाठी अशा विविध कामांसाठी वित्तीय पुरवठ्याची गरज असते.यासाठी राज्य सहकारी बँकेच्या व जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याच्या योजना आखण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी केल्या. तसेच महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या सूचना ही मंत्री राणे यांनी केल्या.

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक अनासकर यांनी यावेळी मच्छीमारांना योग्य ते सहकार्य करण्याचे सांगत जास्तीत जास्त अर्थपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासीत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!