जेव्हा अजितदादा वैभव नाईकांना दटावतात…

मुम्बई,दि.13 (महेश पावसकर)
अर्थसंकल्पा वरील चर्चे दरम्यान सायंकाळी उशिरा आमदार छगन भुजबळ अर्थसंकल्पावर बोलत असताना बहुतांश सभागृह रिकामे होते.सत्ताधारी बाकावर केवळ मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई होते..तर विरोधी बाकावर अजितदादा पवार आणि मोजकेच आमदार होते.उद्धव ठाकरे सेनेचे कुणीच नव्हते अशा वेळेस ठाकरे सेनेचे कुडाळ चे आमदार वैभव नाईक यांना मंत्री उदय सामंत यांनी हाताने खूण करून बोलावले, त्याबरोबर वैभव नाईक मंत्री उदय सामंत यांच्या बरोबर बोलण्यासाठी त्यांच्या मागील बाकावर जाऊन बसले.दोघांमध्ये काही बोलणे सुरू असतानाच अजित दादा पवार यांच्या ते नजरेस पडले, अनुभवी दादांनी वैभव नाईक यांना त्वरित इकडे विरोधी बाकावर या असे सांगितले..अजितदादांच्या आवाजाला लगोलग प्रतिसाद देत वैभव विरोधी बाकावर येताच दादांनी त्यांना बोलावून घेऊन कानोसा घेतला.. यावर मंत्री उदय सामंत यानी हसून सूचक प्रतिक्रिया दिली.. उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान असलेले ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या मुलाच्या शिंदे सेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर अजित दादांनी सावध भूमिका घेऊन उद्धव ठाकरे सेनेच्या आमदारांच्या अनुपस्थितीत ठाकरे गटाच्या आमदाराला दमात घेतल्याची चर्चा विधानभवन परिसरात रंगली.