महाराष्ट्रमुंबई

D-Mart कडून एक्सपायर्ड मालाचे री-पॅकिंग? ग्राहकांच्या जीवाशी चाललेला व्यापार ?

मुंबई : नियमांचा गंभीर भंग करून एक्सपायर व एक्सपायरीजवळ आलेले अन्नपदार्थ बाजारात पुन्हा विक्रीसाठी आणणाऱ्या M/s. Khushi Trading आणि नामांकित D-Mart विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. या प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा थेट धोका निर्माण झाला असून, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. २२ मे रोजी FDA ग्रेटर मुंबई झोन-८ ने Khushi Trading, घाटकोपर (प.) येथे अचानक छापा टाकला.

तपासणीदरम्यान कंपनीकडे FSSAI चा वैध परवाना नसल्याचे तसेच उत्पादन व वितरणाच्या जागा अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळून आले. परंतु सर्वात गंभीर बाब म्हणजे, Khushi Trading ही कंपनी D-Mart कडून एक्सपायर व एक्सपायरीजवळ आलेला माल खरेदी करून, तो पुन्हा रिपॅक करून विकत होती – ही बाब तपासणीदरम्यान उघड झाली. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे FDAने तातडीने अन्न व्यवसाय थांबविण्याचे आदेश Khushi Trading ला दिले. मात्र, २९ मे रोजीच्या अनपेक्षित पुनःतपासणीत, हे आस्थापन बेकायदेशीरपणे पुन्हा कार्यरत आढळले. त्यामुळे IPC कलम २२३ आणि FSSAI कायद्याच्या कलम ५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR क्रमांक : ०५१०गुन्हा क्रमांक : ३४७/२५ या घडामोडीनंतर FDA ने ३० मे रोजी D-Mart च्या नवी मुंबई व भिवंडी येथील स्टोअर्सवर छापे टाकले. तपासात स्पष्ट झाले की, D-Mart एक्सपायर माल Khushi Trading सारख्या अनधिकृत संस्थांना विकत आहे, जे अन्न सुरक्षा कायद्याचे सरळ उल्लंघन आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांनी या संपूर्ण प्रकरणात चौकशी तीव्र करण्याचे आदेश दिले असून, दोषींवर लवकरच पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे. FDAचे संयुक्त आयुक्त मंगेश माने यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षेच्या नियमांचे कठोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कारवाई सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!