पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात जिल्हावासियांना तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्तीची शपथ!
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शेकडो रत्नागिरीकरांनी घेतली जिल्हा तंबाखूजन्य पदार्थ मुक्त करण्याची शपथ घेतली. जिल्हा आरोग्य प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जागतिक तंबाखूविरोधी दिना निमित्त जगभर विविध उपक्रम आयोजित केले जातात त्याचप्रमाणे रत्नागिरीत मायबाप बालसेवा फाऊंडेशनच्या माध्यामातून तंबाखूजन्य पदार्थ मुक्तीसाठी पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य, प्रबोधनपर व्याख्यान तसेच तंबाखू सेवन विरोधी शपथ आदी कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाभर करण्यात येणार आहे.
दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात मायबाप बालसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२५ च्या ‘ आकर्षणाचा मुखवटा उतरवूया तंबाखू आणि निकोटीनच्या उत्पादन उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करूया ” घोषवाक्याचा यावेळी घोष करण्यात आला. सामाजिक व राजकीय नेते बिपीन बंदरकर यांनी सर्वांना शपथ दिली यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडीत, राजेंद्र महाडिक, बाळू साळवी सदर मायबाप बालसेवा फाऊंडेशनचे मुख्य प्रवर्तक अॅड. प्रशांत जाधव यांच्यासह फाऊंडेशनचे अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते तसेच स्काऊट गाईड विभागतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाते. जिल्ह्यातील शेकडो नागरिकांचा या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. सलाम मुंबई फाऊंडेशन कडून उपस्थितांना विशेष धन्यवाद देण्यात आले.