करण जोहरच्या पार्टीत कोण मंत्री होता हे आशिष शेलारांनी सिद्ध करावं,शेलारांना पेडणेकरांचं चॅलेंज

मुंबई – भाजप आमदार आशिष शेलार यांनी चार दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई मनपावर गंभीर आरोप केले होते. निर्माता, दिग्दर्शक करण जोहर याने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रेटींपैकी काहींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होत. करण जोहोरच्या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होता का? असा सवालही उपस्थित केला होता. यावर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलं आहे.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, कोरोनाच्या संकटाला सामोरं जावं लागत असताना मनपा, राज्य सरकार, केंद्र सरकार, स्वत: पंतप्रधान या संदर्भात कायम सतर्क करत असतात. माझा आशिष शेलार यांना सवाल आहे, तुम्ही म्हणाला होता ना की कुणीतरी मंत्री महोदय पार्टीत उपस्थित होते. आता ते सिद्ध करा. दाखववा कोण उपस्थित होते. कारण बेछूट आरोप करायचं, बेछूट आरोप करुन सतत नागरिकांत संभ्रम करायचा.
आता मुंबईच्या जनतेला कळलं आहे, तुमच्या कामाची पद्धत कळली. पुराव्यानिशी सिद्ध करा नाहीतर… आशिष शेलारांना सांगायचंय की, तुम्ही आमदार झालेत, मंत्री महोदय सुद्धा झाले पण जीव अद्याप महानगरपालिकेत घुसमटतोय. उगाच आरोप करु नका. लोकशाहीने अधिकार दिलाय म्हणून काहीही आरोप करु नका.
तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा अपमान करु नका. तुमच्याकडे पुरावे आहेत तर दाखवा आणि सिद्ध करा. कोणतरी कोण होते हे पुराव्यानिशी सिद्ध करा नाहीतर मुंबईकरांची माफी मागावी असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.