अनिल परब यांच्यावर होणार मोठी कारवाई? केंद्राने दिलेली ती मुदत संपली!

मुंबई:– भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या कोकणातील रिसोर्ट वरील पाहणी नंतर अनिल परब यांना अडचणीत आणण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या प्रयत्नशील आहेत. अश्यातच या रिसॉर्टवर केंद्र सरकारच्या वतीने लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने अनिल परब यांना सीआरझेड अंतर्गत येणाऱ्या रिसोर्टवर कारवाई करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती.या नोटिसीमध्ये लवकरात लवकर या रिसॉर्टचे बांधकाम पाडावे अशी सूचना देण्यात आली होती. अन्यथा आपल्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई करण्याची ताकीद केंद्र सरकारने दिली होती.
हे बांधकाम पाडण्यासाठी अनिल परब यांना एक मुदत देखील दिली गेली होती. मात्र आता दिलेल्या मुदतीचा कालावधी पूर्ण झालेला आहे, त्यामुळे केंद्र सरकार आगामी आठवड्यामध्ये पुन्हा एकदा नोटीस बजावून कारवाई करण्याची शक्यता आहे.हे सर्व पाहता अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार आहे,हे निश्चित.