महाराष्ट्रराष्ट्रीय
रशिया-युक्रेन युद्धाच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून कृत्रिम महागाई; तेलासहीत रवा, मैदा यांच्या किंमतीत वाढ
थेट आयातीशी संबंध नसलेले जिन्नस देखील केले महाग

रमुंबई: शियाने युक्रेनवर आक्रमण करताच देशभरात तेल आणि गव्हाची भाववाढ सुरू झाली़ मात्र, आता साखर, सुटे पीठ, रवा, मैदा, गहू, लाल मिरची, पोहे आदींचीही दरवाढ झाली असून, रशिया-युक्रेन युद्धाच्या नावाने व्यापाऱ्यांकडून कृत्रिम महागाई केली जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसांत खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाली असून, प्रत्येक तेल एका किलोमागे वीस रुपयांनी महागले आहे.भारतीय गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली असून, गव्हापासून तयार करण्यात येणाऱ्या मैदा, आटा, रवा, सुजीच्या (जाडा रवा) दरात प्रतिकिलोमागे तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, ज्या जिन्नसांचा थेट आयातीशी काही संबंध नाही, अशा मसाल्याच्या पदार्थाचीही मोठी भाववाढ दिसून येत आहे.