महाराष्ट्रदेशविदेश

जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या MIDC मध्ये ५०० एकर भूखंड राखीव – उद्योग मंत्री उदय सामंत

जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देऊ

मुंबई : जर्मनी येथे पार पडलेल्या “महाराष्ट्र बिजनेस डे” या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. हा कार्यक्रम महाराष्ट्र युरोप बिजनेस फोरम (MSBF) अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली. ही सुरुवात मराठी संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवणारी ठरली. जर्मनीतही मराठी माणूस महाराष्ट्राची संस्कृती घेऊन जगत असल्याबद्दल सामंत यांनी समाधान व्यक्त केलं.

या कार्यक्रमात बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, जर्मनीतले जे उद्योजक महाराष्ट्रात उद्योग करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी एमआयडीसीमध्ये ५०० एकर भूखंड राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या कार्यक्रमात जाहीर केला. त्याचबरोबर अनिवासी महाराष्ट्रीयन नागरिकांसाठीही (NRM) धोरणाअतंर्गत १०० एकर भूखंड राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणाही केली.

जर्मनीतून महाराष्ट्रात येणाऱ्या अशा प्रकल्पांचं महाराष्ट्रात मनापासून स्वागत केलं जाईल आणि त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट सुविधा दिल्या जातील. तसेच जर्मनीतील मध्यम उद्योग प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी जर्मनीतल्या मराठी उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही यावेळी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!