महाराष्ट्रमुंबई

खासदार रविंद्र वायकर व पूर्णस्य योग यांच्या सयुक्त विद्यमाने वर्सोवा बीच येथे मोफत योग शिबीर

मुंबई : भरपूर सूर्यप्रकाश…जवळून येणाऱ्या लाटांचा लयबद्ध आवाज…नैसर्गिक शुद्ध हवा… अशा प्रसन्न वातावरणात असंख्य लोकांच्या उपस्थितीत व साक्षीने योग करण्याची संधी खासदार रविंद्र वायकर व पूर्णस्य योग यांनी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जनतेला उपलब्ध करून दिली आहे. या दिवशी सकाळी ७ वाजता सेव्हन बंगलो, वर्सोवा बीच, डब्लूटीएफ हॉटेल जवळ मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या लोकसभा क्षेत्रातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे हा त्यामागचा उद्देश आहे.

सद्याच्या धावपळीच्या जीवनात शुद्ध हवा, प्रसन्न वातावरणामध्ये योगा करणे अवघड होत आहे. त्यातच कामाच्या ठिकाणाचा ताणतणाव, घरातील अडचणी, बदलली जीवन शैली आदी कारणामुळे मानवी जीवनावर परिणाम होत आहेत. यामुळे अनेक तरुण विविध व्याधींनी त्रस्त आहे. यावर उपाय म्हणून अनेक जण योगाकडे वळत आहेत. शरीराची चपळता, मनाची शांती मिळवण्यासाठी ताणतणाव आणि संघर्षाच्या आधुनिक जगात योगाचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. योगा हा निरामय जीवनाचा सर्वांगींण दृष्टीकोन

समुद्र किनारी योग निसर्ग आणि व्यायामाचे एक शांत मिश्रण प्रदान करते. समुद्र किनारी योगाद्वारे मन, शरीर आणि आत्मा यांचे पोषण करताना निसर्गाच्या उपचारात्मक शक्तीचा जवळून अभ्यास करण्यास मिळणार आहे. २१ जुन रोजी हे सगळ प्रत्यक्ष उपस्थिताना अनुभवयाला मिळणार आहे. तुम्हालाही याचा भाग बनायचे असेल तर आजचे तुमचे नाव ९०८२२५६१२३ या नंबरावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!