महाराष्ट्रमुंबई

रविवारच्या सुट्टीसाठी १३५ वर्षांपूर्वी लढा देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडेंना भारतरत्न मिळावा – अशोकराव टाव्हरे

मुंबई / रमेश औताडे : कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी यासाठी ज्यांनी ७ वर्ष ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा केला. त्या आनंदी रविवारच्या सुट्टीचे निर्माते नारायण मेघाजी लोखंडे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नारायण मेघाजी लोखंडे कनेरसर ता. खेड. जि. पुणे येथील सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८४८ रोजी झाला व निधन ९ फेब्रुवारी १८९७ रोजी झाले. भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून लोखंडे यांना ओळखले जाते. भारतावर ब्रिटीशांचे राज्य असताना कामगार हितासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले.

रविवारच्या सुट्टीचा प्रस्ताव ब्रिटीश सरकारसमोर सन १८८३ मध्ये त्यांनी ठेवला. आठवड्यातून एक दिवस देशसेवेसाठी व समाजसेवेसाठी कामगारांना मिळायला हवा त्या दृष्टीने रविवारची सुट्टी मिळावी या मागणीसाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी संघर्ष केला. सात वर्षाच्या संघर्षानंतर १० जुन १८९० रोजी ब्रिटीश सरकारतर्फे गव्हर्नर जनरल लाॅर्ड ऑकलंड यांनी भारतात रविवार हा सुट्टीचा दिवस घोषित केला.

लाॅर्ड लॅन्सडाऊन च्या काळात मुंबईत १८९३ मध्ये हिंदु- मुस्लिम दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ब्रिटीश सरकारने रावबहाद्दूर ही पदवी बहाल केली. भारत सरकारने रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शुभहस्ते त्यांच्या पोस्ट तिकीटाचे अनावरण केले होते.अशा महान व्यक्तीला भारतरत्न मिळालाच पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!