महाराष्ट्रकोंकण

लांजा बाजारातील ट्रॅफिक जामवर तोडगा – आमदार किरण सामंतांचा पुढाकार

लांजा : मुंबई-गोवा महामार्गाचे लांजा शहरात सुरू असलेल्या कामामुळे मंगळवारी आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची समस्यां डोकेदुखी झाली होती. अख्खा उन्हाळाभर या गर्दीचा सामना जनतेला करावा लागला आता आमदार किरण सामंत यांच्या आदेशाने अखेर लांजा आठवडा बाजरातील ट्रॅफिकची समस्येवर तोडगा काढण्यात आला आहे .लांजा शहरात महामार्गाचे काम सुरू आहे. मंगळवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे बाजाराच्या दिवशी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ट्रैफिक जाम होण्याचा प्रकार वारंवार होत असतो. यामुळे नागरिक त्रस्त होते. दरम्यान गेल्या महिन्यात लांजा तालुका आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली होती.

या बैठकीत आमदार किरण सामंत यांच्या समोर आठवडा बाजारातील समस्येचा विषय येताच त्यांनी तात्काळ लांजा नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यांना सूचना करून सदर समस्या सोडवण्यासाठी आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दि.१० जून रोजी लांजा पोलीस आणि नगरपंचायत कर्मचारी यांनी बाजारपेठेत रस्त्यावर बसलेल्या वापाऱ्यांना रेषा आखून देत त्यांची मर्यादा निश्चित करून देण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडीची होणारी समस्यां काही काळातच कमी झाल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!