रत्नागिरीतील 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित – पालकमंत्री उदय सामंत यांचा थेट संवाद

रत्नागिरी : रत्नागिरीतून 20 जण जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते मात्र ते श्रीनगर मध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी- उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतून गेलेल्या पर्यटकांशी संवाद साधला आहे ते सुरक्षित असल्याची खात्री केली आहे.
जम्मू कश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 20 पर्यटक सुरक्षित असून ते सध्या श्रीनगर येथे आहेत रत्नागिरी येथून कुणाल देसाई आणि त्यांच्यासोबत रत्नागिरीतले जण श्रीनगर मध्ये पर्यटनासाठी गेले होते. कुणाल देसाई हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्यवसाय उपचार तज्ञ म्हणून काम करीत आहेत कुणाल देसाई यांच्यासोबत एकूण 20 जण आहेत रत्नागिरीतील हे सर्व जण श्रीनगर मध्ये सुरक्षित आहेत. कुणाल देसाई यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये काम करणारे कर्मचारी वर्ग आहे, पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी ते सुरक्षित असल्याचे सांगितले.