महाराष्ट्रब्रेकिंग

अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश; टेक ऑफनंतर घडली दुर्घटना, विमानात 242 प्रवासी

गांधीनगर : गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमानाला मोठा अपघात झालेला आहे. अपघाताचे फोटो, व्हिडीओ समोर आलेले आहे. अपघाताची घटना अहमदाबादमधील मेघानी परिसरात घडली. यानंतर परिसरात धुराचे लोट दिसू लागले. अहमदाबादमधून विमानानं उड्डाण करताच अपघात झाला. या विमानात कर्मचाऱ्यांसह एकूण २४२ जण असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेली आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. अहमदाबाद विमानतळावरुन विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळात मेघानीनगर परिसरात विमानाला अपघात झाला.

मेघानीनगर विमानतळापासून १५ किलोमीटर दूरवर आहे. अपघात होताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्याकडून आग विझवण्याचं काम सुरु आहे. सोशल मीडियावर विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विमानाला अपघात होताच आग लागली. धुराचे लोट आसमंतात दिसू लागले. आपत्कालीन यंत्रणा सध्या अपघातस्थळी पोहोचलेल्या आहेत. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मेघानीनगर परिसराजवळ असलेल्या धारपूरमध्येही धुराचे लोट दिसत आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि त्यांचे कुटुंबीय या विमान अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

पहा व्हिडिओ (व्हिडिओ सौजन्य PTI)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!