महाराष्ट्रमुंबईवाहतूक

राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या भाच्याची पत्नी अपघातग्रस्त विमानाच्या एअर इंडियाच्या क्रूमध्ये

मुंबई : एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात १०० प्रवाशांचे मृतदेह सापडल्याचे वृत्त येत आहे. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. याबरोबरच राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या भाच्याची पत्नी देखील एअर इंडियाच्या क्रूमध्ये होती. विमानातील क्रू मेंबर्सची नावे आली असून त्यामध्ये क्लाईव्ह कुंदर- फर्स्ट ऑफिसर, सुमित सबरवाल, अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1, दीपक पाठक केबिन एक्झिक्यूटिव्ह 2, इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील असे आठजण होते. यापैकी अपर्णा महाडिक या तटकरे यांच्या नात्यातील आहेत.

अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांची पत्नी आहेत. अमोल देखील स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत. दोन तासांपूर्वी ते दिल्लीत लँड झाले असून आता ते अहमदाबादला जाणार आहेत, असे महाडिक परिवाराने सांगितले आहे.

लंडनला जाणाऱ्या या एअर इंडियाच्या विमानात २४२ प्रवासी होते, तर हे विमान ज्या भागात कोसळले तो रहिवासी भाग होता. बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पहिले विमान धडकले आहे. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते, हे आता स्पष्ट झाले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!