Break The chain: आज रात्री ८ पासून निर्बंधांची नवीन नियमावली शासनाकडून जाहीर
मुंबई,दि.२०:कोरोना प्रसार रोखण्यासाठी शासना तर्फे आज रात्री ८ वा. पासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वेळेच्या निर्बंधासह फ़क़्त ही दुकाने सुरू रहाणार आहेत.
१) *किराणा दुकाने सकाळी ७ ते ११*
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११
३) भाजीपाला विक्री सकाळी ७ ते ११
४) फळे विक्री सकाळी ७ ते ११
५) *अंडी,मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११*
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११
७) पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११
८)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने
-सकाळी ७ ते ११
९)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने-सकाळी ७ ते ११
१०)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-
सकाळी ७ ते ११
मात्र या सर्व दुकानातून सकाळी ७ ते रात्री ८ वा.पर्यंत कोविड नियंमांचे पालन करून घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील..
(स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल.)
नविन निर्बंधाचा शासकीय आदेश वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा