महाराष्ट्रकोंकणक्राइम

दापोली कृषी विद्यापीठाचा ईमेल आयडी हॅक; 12 निवृत्त कर्मचाऱ्यांचे 11.94 लाख रुपये गायब!

दापोली : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकृत ईमेल आयडीचा ( [email protected]) वापर करून सायबर फसवणुकीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ०२/०६/२०२५ रोजी दुपारी २.५० मी. ते ०५/०६/२०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत या कालावधीत विद्यापीठाचे अधिकृत ईमेल आयडी हॅक करून त्याचा गैरवापर करण्यात आला. या ईमेल आयडीवरून बँकेच्या ई मेल आयडीमधे बदल करून मेल वरील एक्सेल शीट मधे बदल करून त्यात दुसरे खाते नंबर टाकून बनावट एक्सेल शीट एसबीआय बँक दापोली यांच्या मेल आइडी SBI ([email protected]) वर पाठवले. नंतर सदरचा मेल डिलीट करून बदल केले. धक्कादायक म्हणजे या बनावट एक्सेल शीट द्वारे १२ खाते नंबर वर विद्यापीठाच्या १२ निवृत्ती धारक कर्मचान्यांची एकूण ११ लाख ९४ हजार ९३३ रुपये उचलल्पाचे स्पष्ट झाले आहे.
ही गोष्ट उघड झाल्यानंतर या घटनेची तक्रार विद्यापीठातील अधिकारी धनश्री दीपक सामंत यांनी केली आहे. आरोपी अज्ञात असून, त्यांनी फसवणुकीच्या उद्देशाने हा प्रकार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!