जिल्हाधिकारी बसले तहसील कार्यालयाच्या पायरीवर….जाणून घ्या काय प्रकार घडला!
मुंबई : सरकारी कार्यालयांतील उशिरा येण्याच्या सवयीला चाप लावण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अनोखी शक्कल लढवली. शुक्रवारी सकाळी फुलंनी तहसील कार्यालयाच्या पायन्यांवर स्वतः खुर्ची टाकून हजेरी रजिस्टर हातात घेऊन ते बसले आणि उशिरा येणाऱ्या कर्मचान्यांची हजेरी घेतली.
सकाळी १० वाजेपर्यंत केवळ ३ कर्मचारी कार्यालयात हजर होते, तर ४० पैकी ३० कर्मचारी गैरहजर होते. यामुळे जिल्हाधिकान्यांनी गैरहजर कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापण्याचा निर्णय घेतला असून, त्याची नोंद सर्व्हिस बुकमध्ये होणार आहे.
फुलंब्री तहसील कार्यालयातील भूमी अभिलेख, सहाय्यक निबंधक, पुरवठा, दारूबंदी आणि कृषी विभागातील अनेक कर्मचारी गैरहजर आढळले. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांची गाऱ्हाणी ऐकली. त्यांच्या या धाडसी कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांनी याला पाठिंबा दर्शवताना सरकारी कर्मचान्यांवरील संताप व्यक्त केला आहे. “कर्मचान्यांनी वेळेत येऊन नागरिकांची कामे मार्गी लावावीत,” अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.
यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेतही कर्मचान्यांच्या उशिरा येण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सरकारी कार्यालयांतील लालफितीचा कारभार आणि वेळ न पाळण्याच्या सवयींमुळे नागरिक त्रस्त आहेत. जिल्हाधिकारी स्वामी यांच्या या कृतीमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, कर्मचाऱ्यांना वेळेचे भान ठेवण्याचा इशारा मिळाला आहे. यामुळे इतर कार्यालयांमध्येही अशा कारवाया होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी जिल्हाधिकान्यांच्या या पावलाचे स्वागत केले असून, प्रशासनाने यापुढेही कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.