मुंबईमहाराष्ट्र

मराठा आंदोलकांचे महिला पत्रकारांशी गैरवर्तन;पत्रकार संघटनांकडून इशारा

मुंबई: आंदोलकांना आवरा अन्यथा आंदोलनाचे वार्तांकन करणार नाही, अशा आशयाचे पत्र रविवारी टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनने मनोज जरांगे यांना दिले. शनिवारी एका पत्रकार महिलेसोबत आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असभ्य वर्तन केले तर एका व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत धक्काबुक्की करण्यात आली.

या पार्श्व भूमीवर टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, प्रेस क्लब आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे 

या पत्रात मुंबईतील मीडिया प्रतिनिधींना आणि विशेषतः महिला पत्रकारांना आंदोलकांकडून त्रास देणं सुरु आहे. वार्तांकन करताना आंदोलक महिला माध्यम प्रतिनिधींचे कपडे ओढणे, घेरून उभे राहणे, असभ्य टिप्पणी करणे आदी प्रकार सुरू आहेत. आपण स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणता मग महिला पत्रकारांचा अपमान कसा करता, असा सवाल असोसिएशनने केला आहे.

आंदोलकांवर नियंत्रण मिळवताना रेल्वे प्रशासन हतबल

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात स्थान मांडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलक येथे असून त्यामुळे रेल्वे कर्मचारी आणि पोलीस यांना आंदोलकांवर नियंत्रण मिळवताना तारांबळ उडत आहे. अनेक आंदोलकांच्या गाड्या नवी मुंबई परिसरात अडवण्यात आल्या आहेत, त्यामुळे आंदोलक रेल्वे मार्ग रेल्वेने मुंबईत दाखल झाले; मात्र गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे बाहेर झोपण्यासाठी पुरेशी जागा किंवा व्यवस्था न केल्याने आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाचा आसरा घेतला आहे.

सीएसएमटी स्थानकात शेकडो आंदोलक बसले आहेत, रात्रीच्या वेळी काही आंदोलक फलाटावर झोपत आहेत. हा संवेदनशील विषय असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने देखील संयमाची भूमिका घेतली आहे. दरम्यान ‘हा संवेदनशील विषय असल्याने त्याबाबत निर्णय घेण्यास आम्ही हतबल आहोत. काही आंदोलक फलाटावर झोपले आहेत ते रूळावर पडून दुर्घटना होऊ शकते. त्यांना बाजूला होण्याचे आवाहन केले आहे.’ असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!