बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने रत्नागिरीत पत्रकार भवन उभारणार
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी टिळक आळी. रत्नागिरी येथे आयोजित बैठकीस उपस्थित राहून ‘दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दालन उभारणीसंदर्भात विचारमंथन करण्यात आले.
या प्रसंगी रवींद्र बेडीकीहाळ लिखित “आचार्य बाळशास्त्री जांभेकर: कर्तृत्वाचा एक शोध” हे पुस्तक देऊन उदय सामंत ह्यांच्या सन्मान करण्यात आला. याबद्दल उदय सामंत यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या वेळी रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. तसेच पत्रकार साहित्यिक संमेलन रत्नागिरी येथे आयोजित व्हावे, यावरही सविस्तर चर्चा झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीस ज्येष्ठ संपादक राजाभाऊ लिमये, राजीव लिमये, श्रीकांत भिडे आदी उपस्थित होते.