होळी आणि उन्हाळ्यात प्रवाशांची सोय – कोकण मार्गावर उधना–मंगळुरू द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वे
रत्नागिरी : होळी आणि येऊ घातलेला उन्हाळी हंगाम यामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन या मार्गावर उधना जंक्शन – मंगळुरू जंक्श. उधना जंक्शन ही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी २ मार्च ते ३० जून या कालावधीत धावणार आहे.
उधना जंक्शन – मंगळुरू जंक्शन (गाडी क्रमांक ०९०५७) ही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी उधना जंक्शनवरून २ मार्च ते २९ जून या कालावधीत दर बुधवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता मंगलोर जंक्शनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, मंगळूर जंक्शन उधना जंक्शन (गाडी क्र. ०९०५८) दर गुरुवारी आणि सोमवार, ३ मार्च ते जून दुपारी १२.१० वाजता मंगळुरू जंक्शनवरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५ वाजता उधना जंक्शनला पोहोचेल.
या प्रवासात ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, कारमाना रोड, मडगाव, थिविम रोड, ज. अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उड्डुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबेल.
या गाडीला एकूण २२ कोच असून, त्याची रचना २ टायर एसी १ कोच, ३ टायर एसी ५ कोच, स्लीपर १२ कोच, जनरल २ कोच, एसएलआर २ अशी असेल. या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.