क्रीडामहाराष्ट्रमुंबई

दक्षिण आफ्रिकेला मिळाले तब्बल इतके कोटी; RCB ला IPL जिंकूनही मिळाले नाही एवढी रक्कम…

मुंबई : टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजयाची नोंद करताना आफ्रिकेने २७ वर्षांचा आयसीसी स्पर्धा विजेतेपदाचा दुष्काळही संपवला. दक्षिण आफ्रिकेने १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावून पहिले आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर बरेच वर्ष प्रयत्न करूनही ऐन मोक्याच्या क्षणाला त्यांनी कच खाल्ली आणि त्यामुळेच ते चोकर्स म्हणून ओळखले गेले.

पण, २७ वर्षानंतर त्यांना आयसीसी स्पर्धा जिंकला आली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांवर गुंडाळून मैदानावर आलेल्या आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला. पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेत आफ्रिकेचा चुराडा केला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ७ फलंदाज ७३ धावांवर माघारी परतूनही २०क्ष धावपर्यंत मजल मारली. शेवटच्या तीन विकेट्सने जवळपास १०० हून अधिक धावा जोडल्या. अॅलेक्स केरी (४३) व मिचेल स्टार्क (नाबाद ५८) यांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाला २०७ धावांपर्यंत पोहोचवले आणि त्यांनी आफ्रिकेसमोर २८१ धावांचे लक्ष्य ठेवले. मिचेल स्टार्कने आफ्रिकेच्या रायन रिकेल्टन (६) व वियान मुल्लर (२७) यांना बाद केले. पण, मार्करम व बबुमा मैदानावर उभे राहिले. बघुमाचा झेल स्टीव्ह स्मिथने टाकला.

बवुमाच्या मांडीचे स्रायू ताणले गेले होते आणि त्याला चालणेही अवघड झाले होते. तरीही एक कर्णधार म्हणून तो मैदानावर उभा राहिला आणि मार्करमसह दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवून दिला. बवुमा १३४ चेंडूत ५ चौकारांसह ६६ धावांवर बाद झाला आणि मार्करमसह त्याची १४३ धावांची भागीदारी संपुष्टात आली. मार्करमही विजयासाठी ६ धावा हव्या असताना माघारी परतला. त्याच्या २०७ चेंडूंत १४ चौकारांसह १३६ धावा सामन्यात निर्णायक ठरल्या. आफ्रिकेने ५ विकेट्स राखून मॅच जिंकली. ICC WTC Final 2025 totall prize breakdown WTC 2023-25 Final साठीची एकूण बक्षीस रक्कम ही ५.७६ मिलियन डॉलर म्हणजेच ४९ कोटी,२६ लाख, ८१६०० इतकी केली गेली आहे. यापूर्वीच्या दोन पर्वाच्या बक्षीस रकमेच्या डी दुप्पट आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजेतेपदासोबतच ३.६ मिलियन डॉलर (भारतीय रकमेत जवळपास ३१ कोटी) बक्षीस रक्कमही जिंकली आहे. मागील दोन पर्वातील विजेत्यांना १.६ मिलियन डॉलर बक्षीस दिलं गेलं होत. उपविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला थेट ८ लाख डॉलरवरून २.१६ मिलियन डॉलर (१८ कोटी ४७ लाख, ५५.६००) इतकी रक्कम मिळाली. टीम इंडियाही मालामाल भारताला तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्यांना १२,३१,९०,००५ इतकी रक्कम मिळेल. चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंडला १०.३५ कोटी रुपये बक्षीस मिळाले. आहेत.पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा संघ आहे आणि त्यांना ८.२८ कोटी, सहाव्या क्रमांकावरील श्रीलंकेला ७.२४ कोटी बक्षीस रक्कम मिळाली आहे. बांगलादेशला ६.३२ कोटी, वेस्ट इंडिजला ५.१७ कोटी आणि तळाला राहिलेल्या पाकिस्तानला ४.१४ कोटी रक्कम मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!