मनोरंजन

आला रे आला… ‘बिग बॉस मराठी’चा धमाका! तारीख जाहीर

मुंबई – मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे बिग बॅास मराठीचे सुसज्ज आलिशान घर, 100 दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास …. फक्त 15 दिवसांत सुरू होणार आहे. मराठी मनोरंजनाच्या ‘BIGG BOSS Marathi’चा ग्रँड प्रीमिअर रविवारी 28 जुलैला रात्री 9 वाजता ‘कलर्स मराठी’वर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहता येतील.

मराठी मनोरंजनाचा बाप… ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो… सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या चर्चेला उधाण येतं, असा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’ अवघ्या काही दिवसांत सुरू होत आहे. तारीख जाहीर झाल्याने यंदा कोणते स्पर्धक ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धूम करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी’चं बिगुल आता वाजणार आणि स्पर्धकांच्या करामतींचा आता कस लागणार!! प्रत्येक आठवड्यात लागेल झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे.

घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पाहा ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वाजता आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर आणि Jiocinema वर कधीही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!