महाराष्ट्रकोंकण

संगमेश्वर तालुक्यात दुर्मिळ सरडा आढळला; शॅमेलियनचे प्रथमच दर्शन

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील सांगवे येथे दुर्मिळ शॅमेलियन जातीचा सरडा आढळून आला. हिरव्या रंगाचा असलेला हा सरडा रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने आफ्रिका, आशिया, युरोपमध्ये आढळणारा हा सरडा आपल्याकडे क्वचितच आळतो. यापूर्वीही कनकाडी भागात शॅमेलियन जातीचा सरडा आढळल्याचे प्राणी मित्रांनी सांगितले.

विश्वास शेलार हे सांगवे ते देवरूख असा प्रवास करत असताना सांगवे येथे त्यांना रस्त्यावर हा शॅमेलियन जातीचा सरडा आढळला. त्यांनी समोरून येणाऱ्या ट्रक चालकाला थांबवून सरड्याला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. या सरड्याचे त्यांनी प्राण वाचविले. शॅमेलियन जातीचा हा सरडा अतिशय दुर्मिळ आहे. साधारणतः सहा इंच लांब असलेला हा सरडा प्रामुख्याने झाडावर आढळून येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!