नितीन गडकरींची मोठी घोषणा! आता फास्ट टॅगवरच मिळणार प्रवास पास

नागपूर : एक ऐतहासिक पाऊल टाकत १५ ऑगस्ट २०२५ पासून ३ हजार रुपये किमतीचा फास्टटॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येणार आहे. हा पास सुरू होण्याच्या तारखेपासन एक वर्षापर्यंत किंवा २०० यात्रा यापैकी जे पहिले असेल तोपर्यंत वैध राहणार आहे.
हा पास केवळ गैर व्यावसायिक खासगी वाहने (कार-जीप-व्हॅन) यासाठी विशेष रुपात तयार करण्यात आला आहे. तो देशभरातील राष्ट्रीय महामार्गवर तो चालणार आहे. वाषिक पाससाठी लवकरच महामार्ग अॅप आणि एनएचआच्या संकेतस्थळावर एक स्वतंत्र लिंक उपलब्ध केली जाणर आहे. ज्यामुळे पास उपलब्धता अधिक सुलभ होणार आहे.
पास उपलब्ध करून देण्याचे धोरण ६० किलोमीटर परिसरात असलेल्या टोल नाक्यांपासून तर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कस्सर्न्सला अधोरेखीत करेल तसेच टोल नाक्यावर कर देण्याची प्रक्रियाही सुलभ होईल. टोल नाक्यावर होणारा विलंब कमी होईल. नाक्यावर होणारी वाहनांची गर्दीही कमी होईल तसेच विविध कारणांमुळे नाक्यांवर होणारे वादही कमी होतील, असा विश्वास नितीन गडकरींकडुन व्यक्त करण्यात आला आहे.