मुंबई : हवामान विभागाने ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, महाराष्ट्राच्या किनाऱ्याला डोंगी पॉइंट ते बेलापूर पर्यंत उंच लाटांचा इशारा दिला आहे.
१८ जून २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजल्यापासून ते १९ जून २०२५ रोजी रात्री ११:३० वाजेपर्यंत किनारपट्टी भागात ३.५ ते ३.८ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्याच्या आसपास जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लहान जहाजांची वाहतूक पूर्णपणे थांबवावी, असे निर्देश देण्यात आले असून, सर्व प्रकारचे जलक्रीडा आणि मनोरंजन उपक्रम तत्काळ स्थगित करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.