मोठी बातमी!राज्यात सकाळी जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू लागू
सोमवार १० जानेवारी पासून होणार अंमलबजावणी …

मुंबई:-राज्यात कोरोना वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारमार्फत आज अखेर महत्त्वाची नियमावली घोषित करण्यात आली आहे.राज्यात कोरोनाचे रुग्ण जवळपास चाळीस हजारांच्या वर गेले आहेत.अश्यातच राज्यात ओमायक्रॉनने देखील शिरकाव केल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.याच धर्तीवर राज्य सरकारने मोठी घोषणा करत निर्बंधांची नवी नियमावली जाहीर केली आहे. या निर्बंधांमध्ये राज्यात सकाळी जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.तर रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.याचसोबत राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील सूचना येईपर्यंत मैदाने,उद्याने,पर्यटन स्थळे देखील बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तसंच यापुढे सलून, खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात मुभा देण्यात आली आहे.स्विमिंग पूल,स्पा,जीम पूर्णपणे बंद राहणार आहेत.ही नियमावली उद्यापासून लागू होईल,असे देखील सांगण्यात आले आहे.
वाचा, शासकीय अध्यादेश-
ORDER 8th Jan 2022





