कोकण रेल्वेचा नवा प्रयोग: प्रवाशांसाठी ‘कार ऑन ट्रेन’ सेवा प्रथमच सुरु

मुंबई : रो-रो सेवेच्या यशस्वी प्रयोगानंतर, आता प्रथमच प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने कार ‘कार ऑन ट्रेन’ ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे आता तुम्ही स्वतः प्रवास करताना तुमची लाडकी कार थेट रेल्वेने कोकणात किंवा गोव्यात घेऊन जाऊ शकणार आहात. कोकण रेल्वेच्या या घोषणेमुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेली अनेक वर्षे मालाने भरलेले ट्रक रेल्वे वॅगनवरून वाहून नेणारी रो-रो सेवा यशस्वी ठरली आहे. याच धर्तीवर आता खासगी चारचाकी वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास कार चालवण्याच्या त्रासाशिवाय अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आनंददायी होणार आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या गर्दीत हा पर्याय अत्यंत सोयीचा ठरणार आहे. ही सेवा येत्या 23 ऑगस्टपासून सुरू होणार असून, यासाठीचे आरक्षण 21 जुलै 2025 पासून खुले होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘चिंतामुक्त’ प्रवासाचा अनुभव देणारा ठरेल. प्रत्येक कारसाठी शुल्क 7 हजार 875 रुपयेकारसोबत तिघांना एसी कोच अगर एसएलआर डब्यातून प्रवास करता येणारसेवा कधीपासून सुरू? – कोलाड (महाराष्ट्र) येथून: 23 ऑगस्ट 2025 पासून.- वेर्णा (गोवा) येथून: 24 ऑगस्ट 2025 पासून. ही सेवा 11 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहील. आरक्षण कधी आणि कसे? – बुकिंग सुरू: 21 जुलै 2025. – बुकिंगची अंतिम तारीख: 13 ऑगस्ट 2025.
काय आहेत फायदे?
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून सुटका.
प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत.
लांबच्या प्रवासात गाडी चालवण्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाचणार.
कोकणात किंवा गोव्यात फिरण्यासाठी स्वतःच्या गाडीने प्रवास करू शकता, ही सेवा रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा या स्थानकांदरम्यान असेल. कारसोबत केवळ तीन व्यक्तींना प्रवासची परवानगी असेल. एस.एल.आर. किंवा तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्याचे तिकीट काढावे लागेल. कुठून कुठे धावणार ट्रेन ? ही सेवा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान उपलब्ध असेल. या सेवेची सुरुवात कोलाड (महाराष्ट्र) येथून 23 ऑगस्ट 2025 पासून तर वेर्णा (गोवा) येथून 24 ऑगस्ट 2025 पासून होणार आहे.