महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांवर पैशांच्या व्यवहाराचा आरोप; अजित पवारांकडून चौकशीचे आदेश

परभणी: लोकांना सरकारी कार्यालयात सतत चकरा कराव्या लागतात. हा अनुभव प्रत्येक सामान्यांना येतोच येतो. पण ठेकेदारांपासून व्यवसायिकांपर्यंत प्रत्येकालाच लाचखोरी सामान्य वाटते, ती त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे! स्वतःची बिले काढण्यासाठी ठेकेदार व्यवसायिक अधिकान्यांना लाच देतात, पण त्याचा फटका सामान्यांना बसतो! आता तर असा फटका आमदार, खासदारांना बसत असल्याचे दिसून आले आहे!

कारण परभणीतल्या आमदार, खासदारांनी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच जिल्हाधिकारी त्याच्या पीए मार्फत पैसे घेतो. नियोजन विभाग अधिकारी दोन टक्के घेतल्याशिवाय फाईल पुढे सरकवत नाहीत असा थेट आरोप केला. विषय जिल्हा नियोजन विभागाचाच असल्याने अजित पवारांनी समोरासमोरच हा तर माझाच विभाग आहे, मग तुम्ही दोन टक्के कोणासाठी घेता आणि कोणाला देता? असा प्रश्न जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी यांना केला!

अजित पवार एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी तातडीने जिल्हा नियोजन अधिकान्याला सुनावणीसाठी मंगळवारी मंत्रालयात भेटा असा आदेश दिला. आता अजित पवारांचे फर्मान या जिल्हाधिकाऱ्यावरती खरेच काही परिणाम करते का? हे येत्या काही दिवसात समजेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!