महाराष्ट्रकोंकण
रत्नागिरीत मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे उद्घाटन
रत्नागिरी : रत्नागिरी येथील के.सी. जैन नगरमध्ये हस्ती रहो, खेलती रहो!” या टॅगलाईनसह सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन चे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री जी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.उदय सामंत ह्यांच्या हस्ते फित कापून आणि मशीनचे पूजन करून या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महिलांसाठी वापरण्यात येणान्या सॅनिटरी पॅड्सविषयी माहिती घेण्यात आली.
ही पॅड्स पूर्णतः सॅनिटाइज्ड असून, विशेषतः शाळकरी विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. शाळा, महाविद्यालये व इतर ठिकाणी या विषयावर जनजागृती करण्यासंदर्भात उदय सामंत ह्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाला तालुका प्रमुख बाबू म्हाप,हर्षद भाटकर आणि इतर मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.