महाराष्ट्रकोंकण
यशवंतगडाच्या कामात गती; आमदार किरण सामंत यांची भेट, दिले स्पष्ट आदेश
राजापूर : राजापूर तालुक्यातील नाटे येथील घेरा यशवंतगड च्या कामाची रविवारी आमदार किरण सामंत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी, ठेकेदार यांच्या स्थानिक ग्रामस्थांसमोर किल्ल्याची पाहणी करत चर्चा केली यावेळी शिवप्रेमी आणि ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे या किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम दर्जेदार केले जाईल असा शब्द आमदार किरण सामंत यांनी यावेळी दिले.
यावेळी कोसळलेल्या किल्ल्याच्या भिंतीचे काम तातडीने आणि योग्य पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले असून उर्वरित काम ही दर्जेदार केले जाईल असे आश्वासन दिले. संबंधित विभागाने रथानिकांना विश्वासात घेऊन काम करा असे हे सांगितले. यावेळी तहसीदार विकास गंबरे, स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, पुरातन विभागाचे अधिकारी, शिवप्रेमी, मोठ्या संखेने उपस्थित होते.