पेगॅसस स्पायवेअरसाठी मोदी सरकारने खर्च केले सर्वसामांन्यांचे तब्बल इतके कोटी रूपये,न्यूयार्क टाईम्सचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली:- गेल्या राज्यसभेच्या अधिवेशनात गाजलेला पेगॅसस स्पायवेअरचा मुद्दा आता पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला आहे. राजकीय नेते, बडे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी या गुप्त स्पायवेअरचा वापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान भारत सरकारकडून यासंदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अशातच आता आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र असलेल्या न्यूयार्क टाइम्सने भारतासह काही देशांनी पेगॅसस स्पायवेअरची खरेदी केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या लेखानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१७ मध्ये झालेल्या इस्त्राईल भेटीचा संबंध असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलै २०१७ मध्ये इस्राईल दौऱ्यावर गेले होते,तेव्हा भारताने इस्राईलसोबत २ बिलियनचा शस्त्रास्त्र करार केला. यात क्षेपणास्त्र यंत्रणेसह पेगॅसस स्पायवेअरचा देखील समावेश असल्याचं न्यू यार्क टाईम्सच्या अहवालात म्हटलं आहे.
विशेष म्हणजे इस्राईलला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते. भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवर विशिष्ट पॅलेस्टाईन धोरण असूनही ही भेट झाली होती. न्यूयॉर्क टाइम्सच्या याच अहवालावरून आता केंद्र सरकार विरोधकांच्या टीकेचं धनी बनलं आहे. येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.