भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांनी रचला इतिहास; Axiom – 4 मोहीमेसाठी नासाच्या यानातून अवकाशात झेप

मुंबई : भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज (२५ जून) द्वपारी १२.०९ वाजता इतिहास रचला आहे. शुभांशू शुक्ला यांनी नासाच्या (अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था) फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘ॲक्सि ऑम-४’ या अंतराळ मोहीमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केलं आहे. नासाच फॉल्कन ९ हे यान अवकाशात झेपावल आणि त्याबरोबर शुक्ला यांनी ऐतिहासिक कामगिरी केली.
‘ऑक्सि ऑम-४’ मोहिमेअंतर्गत अन्य तिघा अंतराळवीरांबरोबर शुक्ला यांनी आज अवकाशात उड्डाण केल. फॉल्कन ९ या रॉकेटद्वारे त्यांनी अवकाशात उड्डाण केलं आहे. याआधी ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या मदतीने अवकाश मोहीमेवर गेले होते. ४१ वर्षानंतर एक भारतीय अंतराळवीर आज अवकाशात झेपावला आहे. शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनौचे रहिवासी असून ते बायूदलात ग्रुप कैप्टन या पदावर कार्यरत आहेत. १ वर्षाच प्रशिक्षण व कठोर मेहनतीनंतर त्यांची नासाने या मोहीमेसाठी निवड केली आहे.
शुभांशू शुक्ला व त्यांचे सहकारी अंतराळवीर फॉल्कन ९ या रॉकेटशी जोडलेल्या ड्रॅगन या मायक्रो रॉकेटद्वारे अवकाशात प्रवास करणार आहेत. त्यामुळे शुक्ला यांच यान अवकाशात स्थिरावल्यानंतर फॉल्कन ९ हे किट सुरक्षितपणे पृथ्वीवर परतलं आहे. पुढील २८ तासति त्यांचं यान अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राशी जोडलं जाईल. त्यानंतर अंतराळ केंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला जाईल.
एका दिवसात १६ वेळा सूर्योदय व सूर्यास्त पाहणार
अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राशी जोडण्यासाठी या यानाला २८ तास लागणार आहेत. तत्पूर्वी पुढील २४ तासांत हे यान १६ वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार आहे. त्यामुळे एका दिवसांत हे अंतराळवीर १६ वेळा सूर्योदय व १६ वेळा सूर्यास्त पाहतील.
अंतराळ स्थानकात १५ दिवस मुक्काम
शुक्ला हे या मोहिमेचे सारथ्य करत असून अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ते १५ दिवस राहणार आहे. या काळात ते शून्य गुरुत्वाकर्षणात काही प्रयोग करणार आहेत. नासा (NASA) व इस्रो (ISRO भारतीय अंतराळ संशोधन संशा) या दोन दिग्गज अंतराळ संशोधन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात आहे. इस्रो व नासाने केलेल्या संयुक्त कराराअंतर्गत अंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अंतराळवीर पाठवण्याचे निश्चित करण्यात आलं आहे. या करारानंतरच्या पहिल्या मोहिमेअंतर्गत शुभाशु शुक्ला अवकाश प्रवास करत आहेत. त्यांची AXIOM-4 मोहिमेसाठी प्राइम अस्ट्रॉनॉट’ (प्रमुख अंतराळवीर ) म्हणून निवड करण्यात आली आहे.