गोरेगावमध्ये ठाकरे गटाचा प्रशासनावर गंभीर आरोप, माजी नगरसेविका प्रीती सातम यांच्यावर स्वप्रसिद्धीचा ठपका

मुंबई,संदीप सावंत: गोरेगाव पूर्वेकडील मनपा प्रभाग ५२ मध्ये गणेशोत्सवादरम्यान गणेश विसर्जन स्थळी योग्य व्यवस्था नसतानाही माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी स्वप्रसिद्धीसाठी प्रशासनावर दबाव टाकल्याचा आणि कामात हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी केला आहे. त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हे आरोप केले.
गाढवे यांनी आरोप करताना म्हटले की, नगरसेवक पद नसतानाही सातम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून प्रशासनाला कामात हस्तक्षेप करण्यास भाग पाडले. स्वप्रसिद्धीसाठी त्यांनी मदतनीसांना टी-शर्ट्स घालण्यास सांगितले, ज्यावर त्यांचे पक्षाचे व त्यांचे नाव होते. तसेच, विसर्जन स्थळी त्यांनी स्वतःच्या जाहिराती लावल्याचा आरोपही गाढवे यांनी केला.
गाढवे यांनी विसर्जन स्थळाची दुरवस्थाही दाखवली. तिथे गणेश मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. या परिस्थितीतून हिंदू धर्माचा अपमान झाल्याचे सांगत, भाविक मोठ्या श्रद्धेने बाप्पाची पूजा करतात व दुसऱ्या दिवशी अश्या प्रकारे बाप्पा च्या मूर्ती बघुन भाविकांन मध्ये रोष निर्माण झाला आणि याला याला माजी नगरसेविका सातम यांना जबाबदार धरले आणि प्रशासनाला दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
आमदारांचा अपमान झाल्याचा आरोप
यावेळी स्थानिक आमदार सूचना देण्यासाठी घटनास्थळी आले असता, जाणूनबुजून माईक लपवून ठेवण्यात आला, ज्यामुळे त्यांना सूचना देता आले नाही आणि यामुळे त्यांचा अपमान झाला, घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली व जनतेमधुन निवडून आलेल्या संविधानिक पदाचा हा अपमान असल्यामुळे महानगर पालिकेने शिस्त भंगाची कारवाही करण्यात यावी असेही गाढवे यांनी म्हटले.
कृत्रिम तलावाच्या आत मध्ये बाप्पाच्या विसर्जन स्थळावर “लॉलीपॉप सारखी” गाणी लावुन त्यावरती नाचणे हे आपल्या संस्कृतीला कितपत योग्य आहे व कृत्रिम तलावाच्या परिसरात महानगर पालिकेने असे गाणी लाऊन नाचण्याची परवानगी दिली का असा सवाल उपस्थित केला आहे यावर एक महिना अगोदर मी सहाय्यक आयुक्त यांना पत्र दिले होते की या तलावावर कोणत्याही एका राजकीय पक्षाचा हस्तशेप होऊ नये पण महानगर पालिकेच्या हतबल पणामुळे आज हा प्रकार ह्या ठिकाणी घडला आहे .
गाढवे यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर कारवाई झाली नाही, तर हा विषय मोठ्या प्रमाणावर मांडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे गोरेगावमधील राजकारण तापले असून आता भाजपची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.