देशातील पहिला ‘ रोबोटिक लॉकर ’ बुलढाणा अर्बन मध्ये खातेदारांच्या सेवेसाठी सर्वकाही – शिरीष देशपांडे

मुंबई / रमेश औताडे : भारतात पहिल्यांदाच रोबोटिक लॉकर प्रणालीचा प्रयोग बुलढाणा अर्बन सहकारी सोसायटी ने सुरू केला आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे ग्राहकांना आपले लॉकर पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सोसायटी वेगवेगळे प्रयोग करत असते. असे सांगत सोसायटीचे सीईओ शिरीष देशपांडे म्हणाले, खातेदारांचा विश्वास आणि सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या नवकल्पनेद्वारे आम्ही सहकारी बँकिंग क्षेत्रात एक वेगळीच दिशा दिली आहे.
भारताचा हा पहिला रोबोटिक लॉकर प्रयोग सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी एक आदर्श ठरत असून पारंपरिक लॉकर सेवांच्या तुलनेत या तंत्रज्ञानामुळे खातेदारांच्या सुरक्षिततेत आणि गोपनीयतेत मोठी भर पडत असून जेष्ठ नागरिकांना याचा खूप फायदा होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना बॉटम लेवल वरील लोकर वापर करताना खाली वाकून त्रास सहन करत त्याचा वापर करावा लागायचा. मात्र आता रोबोटिक लॉकर मुळे जेष्ठ नागरिकांना मोठ्याप्रमाणावर मदत झाली आहे.
सोसायटीने १२ हजार रुपये भांडवल घेऊन सुरू केलेल्या सोसायटीच्या या प्रवासात १४ हजार ५०० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केला. भारतातील सर्वात मोठी सोसायटी म्हणुन बुलढाणा अर्बन ने एक मानाचा तुरा बँकिंग क्षेत्रात रोवला आहे. ४७६ शाखा, ४३८ गोदामे, ९ हजार ५०० कोटी रुपयांचे एकूण कर्ज वाटप करून विशेष ठेव योजनेत आकर्षक व्याजदर दिले आहेत.
मुंबईत दादर व परिसरातील भागात शाखा विस्तार होत असताना बुलढाणा हे नाव अनेक लोकांना माहित नव्हते, मात्र सोसायटीने आपल्या कार्याने हे नाव अजून मोठे केल्याने शहरात पण बुलढाणा अर्बन नाव आज विश्वासाने आदराने घेतले जाते.