महाराष्ट्रकोंकणवाहतूक

रो-रो बोट थांबणार कुठे? मालवण-रत्नागिरीत जेट्टी नाही; रो-रो बोट प्रकल्पाला अडथळे

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मत्स्य, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी छोट्या गाड्यांसाठी रो-रो सेवा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्या दृष्टीने आता सर्वे सुरू झाला आहे मात्र ही रो-रो बोट थांबण्यासाठी मालवण, रत्नागिरीत जेट्टीच उपलब्ध नसल्याने रोरो सेवेचा गणेश चतुर्थीचा मुहूर्त हुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोकणवासीयांनी रोरो बोट सेवेने मुंबई ते मालवण प्रवास करण्याचा बेत आखला आहे. मात्र तो या वर्षी तरी अशक्य वाटत आहे. मुंबईतील डोमेस्टिक क्रूक्ष टर्मिनस येथून सुरू होणान्या या जलवाहतूक सेवेच्या माध्यमातून अवघ्या साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग, तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे.

ही बोट सेवा गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे. मात्र प्रवासी बोटीसाठी जेट्टीची उभारणी होणे गरजेचे आहे. त्या जेट्टी तयार झाल्या की ही बोटसेवा सुरु होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले रत्नागिरीला अद्यापहीजेट्टी तयार नाही. तर जयगडमध्ये जेट्टी आहे, तिथे रोरोची बोट लागण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करावी लागणार आहे आणि ती सुविधा गणेशोत्सवापूर्वी अशक्य आहे. रो-रो एम2एम कंपनीची ही हायटेक बोट एखाद्या क्रुझप्रमाणे असून तिची किंमतच 55 कोटी इतकी आहे. या अत्याधुनिक बोटीत 500 प्रवासी आणि 150 वाहने ठेवण्याची क्षमता आहे. बोटीचा वेग 24 नॉटिकल माईल्स इतका असून मुंबई ते मालवण अवघ्या 4 तासांत पार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने कोकणात जाण्यासाठी लागणाऱ्या 10 ते 12 तासांच्या तुलनेत अर्ध्याहून कमी वेळ लागणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!