महाराष्ट्रमुंबईशैक्षणिक

हिंदीच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक; ५ जुलैच्या मोर्चाने सरकारला धडकी भरवू – राज ठाकरे

मुंबई : शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज (दि. २६) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हिंदी सक्तीबाबत राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत माहिती दिली. यानंतर राज ठाकरे यांनीही हिंदी सक्तीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा ही तिसऱ्या पर्यायी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मनसेसह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. मुद्द्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. राज्यभरातून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच पुढील निर्णय घ्यावेत, अशा सूचना दिल्या होत्या. यावर आज शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेत त्रिभाषा सूत्रीवरती सरकारची भूमिका मांडली. दोघांमध्ये सुमारे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली.भुसेंबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सरकारची हिंदीबाबतची भूमिका मान्य नाही. हिंदी सक्तीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. हिंदी किंवा अन्य कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही होवू देणार नाही, असे स्पष्ट करत ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटीपासून आम्ही मोर्चा काढणार आहोत. या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल. या मार्चेत सर्वांनी सर्वानी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हिंदी सक्तीबाबत माझ्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय शिक्षण धोरणात अन्य पर्यायही आहेत. यामध्ये मुलांना भाषे ऐवजी पोहणे हाही पर्याय आहे, असे मी सांगितले. महाराष्ट्रात हिंदीच काय अन्य कोणतीही भाषेची सक्ती चालणार नाही, असे स्पष्ट करत ५ जुलै रोजीच्या मोर्चाने सरकारला धडकी भरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!