मंत्री उदय सामंत यांनी आम्हाला कधीच दुजाभाव दिला नाही-भाजपा नेते राजू कीर
मांडवी क्रूझ टर्मिनल होण्यासाठी घेतली बैठक...

मुंबई:विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली म्हणून मी विकासात राजकारण करत नाही टीकेला उत्तर मी कामाने देतो.. असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे व्यक्त केले.रत्नागिरी कुरणवाडी येथे क्रूझ टर्मिनल होण्यासाठी भाजप नेते राजू कीर यांच्या विनंतीवरून सामंत यांनी मुंबई येथील दालनात विशेष बैठक बोलावली होती.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय शिवसेना पदाधिकारी यांचे सोबत बैठका घेत असताना भाजप नेते राजू कीर यांनी ८ दिवसांपूर्वी मांडवी कुरणवाडी येथे क्रुझ टर्मिनल व्हावं ही मागणी घेऊन भेट घेतली होती.त्यावेळी सामंत यांनी देखील पक्षभेद बाजूला ठेऊन रत्नागिरीच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे त्यांना आश्वासन दिले होते.सामंत यानी या भेटीदरम्यान सांगितल्या प्रमाणे ५ ऑक्टोबरला त्यांच्या मुंबई येथील दालनामध्ये बैठक संपन्न झाली.सामंत यांनी या बैठकीला मेरिटाईम बोर्डचे आयुक्त अमित सौनिक याना बोलावून रत्नागिरी कुरणवाडी येथे क्रूझ टर्मिनल होण्यासाठी सविस्तर चर्चा केली यावेळी भाजपा नेते राजू कीर, शिवसेना नगरसेवक नितीन तळेकर,विवेक सावंत,माजी तहसीलदार शिवलकर उपस्थित होते.
भाजपा नेते राजू कीर यानी मांडवी येथील क्रूझ टर्मिनल बाबत झालेल्या बैठकीबाबत समाधान व्यक्त करताना ,*रत्नागिरीचा विकास करताना मी भाजपा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून उदय सामंत शिवसेनेचे मंत्री असूनसुद्धा विकासाच्या आड राजकारण आणत नाहीत किंवा आम्हाला दुजाभाव देत नाहीत*या बाबत समाधान व्यक्त केले याबाबत सामंत याना विचारल असता त्यांनी देखील रत्नागिरीच्या हितासाठी टीकाकारांची टिका विसरून काम करणं माझ्यासाठी महत्वाचं आहे असे म्हटले.