महाराष्ट्रमुंबई
आमदार सुनील प्रभू ‘लोकस्वातंत्र्य समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई (प्रतिनिधी) – दिंडोशी मतदारसंघाचे शिवसेना आमदार आणि मुंबईचे माजी महापौर सुनिल प्रभू यांना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव या राज्यस्थरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आह. त्यांच्या जनसेवेबद्दल आणि राजकीय तसेच सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सदिच्छा भेटीदरम्यान संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख तसेच राष्ट्रीय पदाधिकारी आणि शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांच्या हस्ते सुनील प्रभू यांना सन्मान स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.