गोरेगाव मिरर

दिंडोशीतील आठही प्रभागात युवासेनेच्या माध्यमातून राबवणार ऑक्सिजन बँकची अनोखी संकल्पना…

युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत सुनील प्रभू यांची घोषणा..

मुंबई,दि.२२:दिंडोशी विधानसभा मतदार संघातील आठही प्रभागात युवासेनेच्या माध्यमातून ऑक्सिजन बँकची अनोखी संकल्पना राबवण्याचा निर्धार युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत सुनील प्रभू यांनी केला आहे.

कोविड रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून ऑक्सिजन बँकची अनोखी संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला.त्यांची ही संकल्पना दिंडोशी विधानसभा मतदार संघातील आठ प्रभागात युवासेनेच्या माध्यमातून राबवण्याचा निर्धार युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत सुनील प्रभू यांनी केला आहे.

त्या नुसार शिवसेना युवासेना दिंडोशी विधानसभा व शुभारंभ फाउंडेशनच्या वतीने या ऑक्सिजन बँक मोहिमेचा शुभारंभ नुकताच शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभु यांच्या हस्ते त्यांच्या गोरेगाव पूर्व आरे चेक नाक्या समोरील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला. या ऑक्सिजन बँकेच्या संकल्पने बद्दल  गोरेगाव मिरर ला अधिक माहिती देतांना अंकीत प्रभू म्हणाले की,कोविड रुग्ण घरी असतांना त्याची ऑक्सिजन पातळी ही कमी जास्त होत असते.त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी दिंडोशी युवा सेनेच्या माध्यमातून दिंडोशी विधानसभेतील आठ ही प्रभागात आम्ही “ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मोफत उपलब्ध करून दिले आहे. यासाठी युवासेनेची 24 जणांची टीम डॉक्टर आणि नर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असेल.

गरजू कोविड रुग्णांनी येथील युवा सेनेच्या टीमशी संपर्क साधल्यावर त्यांना त्वरित घरपोच “ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन” उपलब्ध करून दिले जाईल. सदर मशीन कसे ऑपरेट करायचे याचे प्रात्यक्षिक दिले जाईल. कोविड रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळाल्यावर त्यांच्या घरून  “ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन” घेऊन येतील. कोविड रुग्णांना वेळीच ऑक्सिजन मिळाल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करे पर्यंत त्यांची खाली येणारी ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!