
मुंबई – गेल्या २ वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.अश्यातच आपल्या राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आल्याचे चित्र दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शिवाय, ओमायक्रॉन बाधित रूग्ण संख्येतही भर पडत आहे.
त्यातच आज दिवसभरात तब्बल २६ हजार ५३८ नव्या कोरोनाबाधितांची भर राज्याच्या एकूण आकड्यामध्ये झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅक्टिव्ह कोरोनाबाधिताचा आकडा आता ८७ हजार ५०५ इतका वाढला आहे. त्यासोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांचा आकडा देखील तब्बल ७९७ वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात वाढ झालेल्या बाधितांमुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण बाधितांचा आकडा ६७ लाख ५७ हजार ०३२ इतका झाला आहे. त्यापैकी महाराष्ट्रात ८७ हजार ५०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईतील कोरोना परिस्थिती-
राज्यासह मुंबईमधील कोरोना परिस्थिती चिंतेचा विषय बनत आहे.आज दिवसभरात मुंबईत १५०१४ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून कालच्या तुलनेत आज रूग्णसंख्या वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.तर दिवसभरात मुंबईत ५०८ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले आहेत.