मुंबई मराठी पत्रकार संघावर संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलचा झेंडा

मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघाच्या काल झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये अखेरीस संदीप चव्हाण यांच्या टीमने दणदणीत विजय मिळवत परिवर्तन पॅनलचा झेंडा फडकवला आहे. ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांची मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने निवड झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांच्या वर्तुळात मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक ही सातत्याने चर्चेचा विषय होती. ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर हे समर्थ पॅनल तर्फे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तथापि परिवर्तन पॅनलचे ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांनी तब्बल 316 मते खेचून घेत विजय मिळवला. खांडेकर यांना 160 मते मिळाली. ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यामुळे ते निवडून येतात का याकडे मंत्रालयासह संघातील अन्य माध्यम प्रतिनिधींचेही लक्ष होते. तथापि परिवर्तन पॅनलच्या ज्येष्ठ पत्रकार स्वाती घोसाळकर यांनी 288 मते मिळवत बाजी मारली.
उदय तानपाठक यांना 208 मते मिळाली. तर राजेंद्र हुंजे यांना 225 आणि विष्णू सोनवणे यांना 203 अशी नेते मिळाली राजेंद्र हुंजे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आले. पत्रकार संघाच्या कार्यवाहपदी ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र शिर्के यांचा देखील मोठ्या मतांनी विजय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकांत नाईक यांनी काम पाहिले. तर विजय तारी आणि हेमंत सामंत यांनी त्यांना सहाय्य केले. परिवर्तन पॅनल आणि समर्थ पॅनलला मिळालेली मते आणि निकाल पुढीलप्रमाणे
कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड यांचा 210 मतांनी विजय, जगदीश भोवड 336, सारंग दर्शने 126,परिवर्तन पॅनल कार्यकारणी सदस्य विजयी उमेदवार ( ९), देवेंद्र भोगले 282, दिवाकर शेजवलकर 282, जानन सावंत 274, आत्माराम नाटेकर 273, विनोद साळवी 272, किरीट गोरे 247, अंशुमान पोयरेकर 246, राजेश खाडे 245ए राजीव कुलकर्णी 234 तर समर्थ पॅनल, कल्पना राणे 185, श्यामसुंदर सोन्नर 174, उमा कदम 172, रवींद्र भोजने 162, नंदकुमार पाटील 161, अरविंद सुर्वे 146,संतोष गायकवाड 142, विठ्ठल बेलवाडकर 116, राजेंद्र साळस्कर 104, महेंद्र जगताप 94, केतन खेडेकर 92.