महाराष्ट्रमुंबईवाहतूक

ठाणे लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक घटना; महिला प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट

ठाणे येथे लोकल ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाला. त्यामुळे काही काळ लोकलच्या डब्यात घबराट पसरली. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण उपनगरीय ट्रेनमध्ये सोमवारी रात्री कळवा स्थानकावर घडलेल्या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

सीएसएमटी रेल्वे नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पण, यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली. त्यांनी सांगितले की स्फोटामुळे धूर निर्माण झाला आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर केला. एका प्रत्यक्षदर्शीन सांगितले की, कमी तीव्रतेचा स्फोट ऐकू आला. स्फोटामुळे डब्बा धुराने भरला, ज्यामुळे अनेक प्रवासी उतरण्यासाठी दाराकडे धावले. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले, असे प्रत्यक्षदर्शीन सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!