महाराष्ट्रकोंकणवाहतूक

एसटी प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाचे, बसस्थानकांवर सीसीटीव्ही बसवणार – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या 22 बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

खेड गोळीबार मैदान येथे खेड बसस्थानकाचे भूमिपूजन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते आज झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, तहसिलदार सुधीर सोनवणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, शशिकांत चव्हाण, अण्णा कदम, सचीन धाडवे, कुंदन सातपुते आदी उपस्थित होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, सर्वसामान्य जनता एसटीमधून प्रवास करत असते. त्यामुळे सर्वांना एसटीबद्दलची एक वेगळी आपुलकी आहे. एसटी बसस्थानक सुसज्ज असणे, एसटी स्वच्छ असणे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून गृह राज्यमंत्री कदम यांनी या प्रकल्पासाठी निधी मंजूर करुन घेतला. यामधून सुसज्ज असे बसस्थानक उभे राहील. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी मिनी बसेस देण्याच्या मागणीसाठी आपण जिल्ह्यातील सर्व आमदारांसह परिवहन मंत्र्यांची भेट घेऊ आणि पुढील सहा महिन्यात मिनी बसेस उपलब्ध करुन घेऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महिलांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या 22 बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात येत आहे. सुरक्षितेबरोबर आरोग्यही फार महत्त्वाचे आहे. आरोग्याच्य दृष्टीने एसटी बसस्थानकातील सर्व शौचालयेही स्वच्छ असणे गरजेचे आहे. बसस्थानक स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या मागणीनुसार खेड येथील क्रीडांगणासाठीही निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

गृह राज्यमंत्री कदम म्हणाले, खेड बसस्थानक एक नवं स्वरुप घेणार आहे. याचे समाधान आहे. या बसस्थानकामुळे नागरिकांचा त्रास, समस्याही दूर होणार आहेत. येथे बसस्थानक होत असल्याने आता मैदानाची गरज भासणार आहे. जिल्हा नियोजन मधून मैदानासाठी येथील मागील बाजूला आरक्षित जागेवर क्रीडांगणासाठी निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. भौगोलिक परिस्थिती पहाता या भागामध्ये मिनी बसेस आवश्यक आहेत. त्यामुळे नवीन बसेस घेत असताना त्याबरोबर मिनी बसेसही घ्याव्यात, यासाठी आपण पाठपुरावा करु, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक बोरसे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!