‘कमॉन किल मी’…. मी तुमच्याशी लढायला तयार आहे.. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातून उद्धव ठाकरे गरजले !
मुंबई : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना सोहळ्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीकेचे प्रहार केले.
देशाला आज पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची गरज आहे, मात्र मोदी हे भाजप चे पंतप्रधान आणि शहा हे भाजपचे गृहमंत्री आहेत अशी तिखट टीका केली. निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनीशी केलेला वादा, जनतेशी केलेला वादा पाळत नाही. मग तो पक्ष माझ्याशी केलेला वादा कसा पाळतील. अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा वादा नव्हता म्हणतात. मग माता भगिनीला केलेला वादा खरा होता की नव्हता. केंद्रात सरकार आल्यापासून पनवतीं लागली आहे. मंदिराचं छत गळतंय, विमान अपघात झाला, रेल्वे अपघात झाला कोणी जबाबदारी घेत नाही. मेट्रोत स्थानकात पाणी भरलं. आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे. भाजपला पंतप्रधान आहे. देशाला नाही. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे. घरफोड्या अमित शाहची नाही. देशाला संरक्षण मंत्र्याची गरज आहे. गुंडाला संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगाची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केला.
मोदींना विचारतोय, पंतप्रधानांना कठोर शब्दात बोलणं योग्य नाही. इंडिया आघाडी उभी केली तर इंडियन मुजाहिद्दीन बरोबर आमची तुलना करायला लाज वाटली नाही. जर आम्ही इंडियन मुजाहिद्दीन सारखे होतो तर तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक जगात करायला आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
प्रहार चित्रपटातील नाना पाटेकर यांचा डायलॉग ‘कमॉन किल मी’…. हा म्हणत,मी तुमच्याशी लढायला तयार आहे.. मला मारायला या पण येताना एम्बुलेंस घेऊन या हा अमिताभ चा प्रसिद्ध डायलॉग ऐकवून ठाकरेंनी आपले भाषण आटोपले.