समुद्राला आलेल्या भरती मुळे लालबाग च्या राजाचे विसर्जन रात्री १०.३० नंतर…

मुंबई : मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन प्रथमच तब्बल १२ तास रखडले आहे.
अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळ उलटूनही अद्याप लालबागचा राजाचे विसर्जन होऊ शकलेले नाही. गेल्या १२ तासांपासून लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर अडकला असून राजाच्या विसर्जनासाठी अजूनही प्रयत्न सुरु आहेत. लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही रखडलं असून रात्री 10.30 नंतर विसर्जन होणार आहे. लालबाग सार्वजनिक मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी ही माहिती दिली आहे. तसेच विसर्जनाला उशीर झाल्याने दिलगिरी देखील साळवी यांनी व्यक्त केली आहे.
समुद्राला आलेल्या भरतीमुळं लालबागच्या राजाची मूर्ती समुद्र किनाऱ्यावरच अडकलेली आहे. गेल्या १२ तासांपासून विसर्जनासाठी प्रयत्न सुरु आहेत. लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी यंदा खास स्वयंचलित तराफा आणण्यात आला आहे. या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात काही अडचणी येत होत्या. अखेर अथक प्रयत्नांनतर राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आले आहे. सुधीर साळवी म्हणाले, मुंबईत दोन दिवसापासून मुसळधार पऊस पडत आहे, त्यामुळे भरती लवकर आली. त्यामुळे आम्ही मंडळाने निर्णय घेतला की विसर्जन थांबवले पाहिजे कारण त्यावेळी विसर्जन करण्यात अनेक अडचणी येत होत्या.सर्व भाविकां चे श्रद्धास्थान असलेला बाप्पाचे विसर्जन अयोग्य रितीने होण्यापेक्षा थोडा उशीर झालेला चालेल.