महाराष्ट्र

GST 2.0 : फॉर्म्युनरच्या किंमतीत 3.49 लाखांपर्यंत घट; वाहन कंपन्यांनी किंमती केल्या कमी

मुंबई : जीएसटी काऊन्सिलने ४ मीटर लांब आणि १२०० सीसी इंजिनपर्यंतच्या गाड्यांवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केले आणि उपकरदेखली काढून टाकला आहे. यामुळे वाहन कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता आगामी दसरा- दिवाळीच्या शुभमूर्हुर्तावर ग्राहकांनाही त्याचा फायदा देण्यासाठी कंपन्या सज्ज झाल्या आहेत.

सोमवारी, आँडी इंडियाने त्यांच्या सर्व गाड्यांच्या किंमतीतमध्ये घट करत असल्याची घोषणा केली. लक्झुरी वाहन उत्पादक कंपनीने त्यांच्या सर्व गाड्यांच्या पोर्टफोलियोमध्ये मॉडेलनुसार अंदाजे २.६ लाख ते ७.८ लाखांपर्यंत घट केली आहे. यांसंदर्भात आँडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लों म्हणाले की, जीएसटी सुलभीकरण हे योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. यामुळे उद्योगाच्या वाढीस हातभार लागेल आणि आम्हाला बाजारपेठ अधिक विस्तारण्यास मदत होईल. यामुळे पारदर्शकता वाढते आणि भारताच्या आर्थिक दृष्टिकोनाशी सुसंगतता साधली जाते.

ईव्हींसाठी कमी करदर कायम ठेवण्याचा जीएसटी कौन्सिलचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे आवश्यक ती स्पष्टता मिळते आणि आमचे पोर्टफोलिओ आमच्या जाणकार ग्राहकांसाठी अधिक सुलभ होते. अशा सुधारणा व्यवसाय वातावरण स्थिर करण्यास मदत करतात आणि सर्व भागधारकांच्या फायद्यासाठी धोरणे आखण्यास सक्षम करतात.

टोयोटा किर्लोस्करने त्यांच्या बहुलोकप्रिय फाँर्चुनरच्या किंमतीत ३.४९ लाखांपर्यंत घट केली आहे. त्याशिवाय कंपनीने इतर वाहनांची किंमत अंदाजे १ लाख ते अंदाजे साडे तीन लाखांपर्यंत खाली केली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपव्यवस्थापकीय संचालक स्वप्रेश आर. मारू म्हणाले की, भारताच्या अधिक सक्षम आणि सक्षम अर्थव्यवस्थेकडे वाटचाल वेगवान करण्याच्या दृष्टीने केलेल्या ऐतिहासिक दुसऱ्या पिढीच्या जीएसटी सुधारणेसाठी आम्ही सरकारचे आभार मानतो व अभिनंदन करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!